आदर्श शिंदे याच्या दमदार आवाजातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिकेचं शीर्षकगीतं

https://www.facebook.com/DashamiCreations/videos/666208357163025/

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या जीवनावर आधारीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिका लवकरच स्टार प्रवाहवरुन रसिकांच्या भेटीला येत आहे. पु.ल. देशपांडे यांची भूमिका साकारणारा अभिनेता सागर देशमुख (Sagar Deshmukh) या मालिकेत बाबासाहेबांच्या भूमिकेत दिसणार आहे. बाबासाहेबांच्या लूकमधील सागर याची पहिली झलक समोर आल्यानंतर आता मालिकेचं शीर्षकगीत रसिकांच्या भेटीला आलं आहे. लोकप्रिय गायक आदर्श शिंदे आणि उत्कर्ष शिंदे यांच्या संकल्पनेतून हे गीत साकारलं आहे.

आदर्श आणि उत्कर्ष यांच्या लेखणीतून अवतरलेले गीत या दोघांनीच संगीतबद्ध केले आहे. तर आदर्शच्या दमदार आवाजात आपल्याला मालिकेचं टायटल ट्रॅक ऐकायला मिळणार आहे. या गीताची खास झलक आदर्शने इंस्टाग्रामवर शेअर केली आहे.

आदर्श शिंदे याच्या दमदार आवाजातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिकेचं शीर्षकगीतं

Author – Darshana Pawar

Published On – Marathi Latestly, May 09, 2019, 01:13 PM IST

Past Events

गौरवगाथा

चित्रपटांमधून चरित्रपट साकारण्याची पद्धत तशी जुनीच आहे. (लोकसत्ता)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिकेत अभिनेत्री शिवानी रांगोळे रमाबाईंच्या भूमिकेत

तीव्र इच्छाशक्ती असलेलं ऐतिहासिक पात्र साकारणं हे माझं स्वप्न होतं. आणि माझे स्वप्न सत्यात अवतरले आहे – शिवानी रांगोळे . (Marathi Latestly)

Share On :

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin