गौरवगाथा
चित्रपटांमधून चरित्रपट साकारण्याची पद्धत तशी जुनीच आहे. (लोकसत्ता)
Author – मुकुंद कुळे
Published On – Maharashtra Times, Fri,2 Jun 2017 11:00:01 +05:30
आंबट-गोड चवीचा मुरांबा सगळ्यांनाच आवडतो. तो काहीसा जुना असेल, तर त्याची मुरलेली चव छान असतेच, पण तो बाजारातून छान आंबे आणून नुकताच केलेला असेल, तर त्याची फ्रेश चव आणखी छान चटपटीत लागते. अगदी जिभेच्या टोकावर घोळवत घोळवत तो खाल्ला जातो आणि नंतरही काही वेळ त्या चवीच्या आठवणीत रेंगाळण्यात मजा वाटते. अगदी असंच ‘मुरांबा’ सिनेमा पाहताना होतं. फ्रेश चेहरे, फ्रेश कथानक आणि सिनेमाची हाताळणीही फ्रेश. त्यामुळे काही काळासाठी आपला मूडही फ्रेश होऊन जातो, एकदम ताजातवाना… नि सिनेमा संपल्यावर आजच्या पिढीचा सिनेमा पाहिल्याचं समाधान मिळतं.
अर्थात सिनेमातल्या सगळ्याच गोष्टी सगळ्यांनाच मान्य होणार नाहीत, कदाचित… कारण अजूनही तेवढा उघड मोकळेपणा (छुपा आहे) आपल्या समाजात अजून आलेला नाही. तरीही या ‘मुरांब्या’ची चव आपल्या घरात हवी खास, असं कुणाही पाहणाऱ्याला वाटेल एवढं नक्की!
‘मुरांबा’ची गोष्ट तशी प्रत्येकाच्या घरातलीच आहे. प्रेमात पडलेल्या, प्रेमाच्या नात्यात गोंधळलेल्या आणि करियरमध्ये भांबावलेल्या मुलाची. पण ‘मुरांबा’मध्ये आलोकला (अमेय वाघ) जसे त्याचे आई-बाबा(सचिन खेडेकर आणि चिन्मयी सुमीत) मैत्रीच्या पातळीवर येऊन समजून घेतात, तसं प्रत्येकाच्या घरी होत नाही. अर्थात आलोकचे बाबा जेवढे फ्रेंडली नेचरचे आहेत, तेवढी त्याची आई नाही. ती अजूनही काहीशा जुन्या संस्कारांत अडकलेली आहे. पण सगळ्या आयांप्रमाणे तिची पोरावर माया आहे. त्यामुळे ती त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करतेच… आणि कुटुंबातल्या या सगळ्या परिस्थितीच्या केंद्रस्थानी आहे इंदु, म्हणजे इंद्रायणी(मिथिला पालकर). कारण आलोक इंदूच्या प्रेमात आहे आणि गेली तीनेक वर्षं सुरळीत सुरू असलेलं त्यांचं अफेअर नुकतंच ब्रेक झालंय. या ब्रेकअपनंतरचा दिवस म्हणजे हा ‘मुरांबा’… आणि तो चाखण्यासाठी थिएटरमध्ये जायलाच हवं.
अगदी साधं-सोपं कथानक आहे ‘मुरांबा’चं. कसलेच कसोटीचे भावनिक चढउतार नाहीत, परिस्थितीतले कुठलेच जीवघेणे ताणतणाव नाहीत की कुठलं धक्कातंत्रही नाही… अन् तरीही हा सिनेमा फुल्ल एंजॅाय करतो आपण. कारण त्यात आजच्या पिढीची, त्यांना समजून घेणाऱ्या आजच्या पालकांची गोष्ट आहे आणि ती सिनेमाच्या आजच्याच तंत्रात सांगितलेली आहे. त्यामुळे पडद्यावर डोळ्यांनी दृश्यं पाहताना, कानाने त्या दृश्यांतील संवाद ऐकताना आणि मनाने तो भाव जगताना आपण आजच्या काळाशी समरस होतो, इतके आपण त्यात अडकतो.
या सिनेमातील आईच्या तोंडी एक वाक्य आहे- ‘आधी तो म्हणाला, ती माझी मैत्रीण आहे. मग म्हणाला ती माझी खास मैत्रीण आहे आणि नंतर म्हणाला ही तुझी होणारी सून आहे.’ या साध्या वाक्यातून मैत्रीपासून प्रेमापर्यंत पोचलेल्या एका नात्याची वाटचाल अधोरेखित केली आहे आणि तोच या सिनेमाचा गाभा आहे. ही कथा सफल-विफल प्रेमापेक्षा कुठल्याही नात्याच्या गाभ्याशी एकमेकांबद्दल जे वाटणं आहे, त्याची ही कथा आहे. ते नातं मग प्रेयसीबरोबरचं असो किंवा आई-वडिलांबरोबरचं असो.
सिनेमातील सगळ्याच कलाकारांनी आपली कामं चोख केलीत. आलोक आणि इंदूची जोडी एकदम फ्रेश आहे. अमेय आणि मिथिलाने भूमिकेचे सूर नेमके पकडलेत. प्रेमात तुटणं आणि पुन्हा सावरणं यात कुठेही अतिरेक नाहीय. सेम असंच सचिन खेडेकर आणि चिन्मयी सुमीत यांच्याबद्दल बोलता येईल. सचिन खेडेकर यांनी बापाच्या नात्यांतला समंजसपणा अतिशय खेळकर आणि लोभसपणे निभावलाय. चिन्मयी सुमीत यांनी साकारलेली आई खासच. ही आई पारंपरिक नि आधुनिक जीवनशैलीच्या उंबरठ्यावर ओठंगून उभी आहे. त्यांनी आपल्या भूमिकेत जी निरागसता जपलीय, ती ग्रेटच आहे.
सिनेमातील कथा-पटकथा-संवाद सारंच भन्नाट आणि आजच्या काळाशी रिलेट करणारं आहे. सिनेमाच्या छायाचित्रणातही हा ताजेपणा जाणवतो. तसंच गाणी आणि संगीतातही. या सगळ्याचं बरचसं श्रेय दिग्दर्शक असलेल्या वरुण नार्वेकरला एकहाती जातं. कारण केवळ दिग्दर्शनच नाही, तर कथा-पटकथा-संवादही त्याचेच आहेत.
नात्यातील आंबटगोडपणा चाखायचा असेल, तर हा सिनेमा चुकवू नका.
चित्रपटांमधून चरित्रपट साकारण्याची पद्धत तशी जुनीच आहे. (लोकसत्ता)
After faring well at the auditions, Amrut Gaikwad has bagged the coveted role. (Times of India)
आदर्श आणि उत्कर्ष यांच्या लेखणीतून अवतरलेले गीत या दोघांनीच संगीतबद्ध केले आहे. तर आदर्शच्या दमदार आवाजात आपल्याला मालिकेचं टायटल ट्रॅक ऐकायला मिळणार आहे. (Marathi Latestly)
Dashami is the entertainment production house which makes Films, Television shows & Serials, Advertisements, Digital web series etc. Dashami has a pool of highly creative, trained and motivated professionals and produced various Award winning movies and TV
Shows in Marathi & Hindi.